स्पर्धेत 21 मुलांच्या तर 9 मुलींच्या संघांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्टस् कौन्सिल आयोजित दहाव्या 13 वर्षांखालील फिनिक्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला 29 जुलैपासून कनक मेमोरियल स्कूल, नेहरुनगर येथे प्रारंभ होणार आहे.
ज्ये÷ पंच रॉयस्टीन जेम्स यांच्या हस्ते सर्व लॉटस् काढण्यात आले. यावषी या स्पर्धेत 21 शालेय संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये कनक मेमोरियल, पोतदार इंटरनॅशनल, केएलई, संत मीरा, लव्हडेल, भरतेश, इस्लामिया, एमव्हीएम, केएलएस, केएलएस पब्लीक, फिनिक्स पब्लीक, मदनी, ज्ञानप्रबोधन, बाशिबन, ज्ञानमंदिर, सेंट पॉल्स, अमृता विद्यालय, जी.जी.चिटणीस, सेंट झेवियर्स, गुडशेफर्ड व कर्नाटक दैवज्ञ या संघांचा समावेश असून या 21 संघांना सात गटात विभागण्यात आले आहे. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली जाणार असून प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
मुलींच्या गटात 9 संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये सेंट जोसेफ, कनक मेमोरियल, फिनिक्स पब्लीक, जी.जी.चिटणीस, संत मीरा, ज्ञान मंदिर, सेंट झेवियर्स, महिल विद्यालय व डी.पी. स्कूल या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा 4 ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून 7 ऑगस्ट रोजी अंतिम सामना खेळविला जाणार आहे. 9 संघांना तीन गटात विभागले गेले असून प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
या बैठकीत प्राचार्या विद्या वगण्णावर, फिनिक्स स्पोर्टस् कौन्सिलच्या सचिव अलका पाटील, शिवालाल कलाल, शिवानंद दमनगी, क्रीडा शिक्षक अरुण कांबळे, बसवराज एम., सी. आर. पाटील, उमेश मजुकर, प्रमोद पालेकर, बाबु देसाई, सचिन पाटील, बसू शिंदीनकोप्प, ओजस रेवणकर, इम्रान बेपारी, भरत जी., अल्ताफ, आकाश मंडोळकर, जोसेफ परेरा, राहुल मगदूम आदी उपस्थित होते.