नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक एचडीएफसी यांनी 2022-23 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये आपल्या निव्वळ नफ्यामध्ये 19 टक्के इतकी वाढ दर्शविली आहे. 2022 जूनच्या तिमाहीअखेर बँकेने 9 हजार 195 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जो मागच्या वर्षी समान अवधीत 7 हजार 729 कोटी रुपये इतका होता. बँकेचा एकंदर महसूल 19 टक्के वाढत 27 हजार 181 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जून तिमाहीमध्ये नव्या 36 शाखा सुरू करण्यात आल्या असून 10 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.









