वार्ताहर /आमोणे
सरकारी माध्यमिक विद्यालय आमोणा येथे विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास क. घाटवळ उपस्थित होते.त्यांच्यासोबत हायस्कुलचे मुख्याध्यापक उल्हास गावकर,ज्ये÷ शिक्षीका सौ.योगिता नागवेकर,विद्यार्थी मंडळाच्या प्रभारी सौ.प्रमिशा सुर्लकर आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री उल्हास गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निवड करण्यात आलेले विद्यार्थी मंडळाचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत
सरचिटणीस-कु.सावली चोडणकर,विद्यार्थिनी प्रतिनिधी-कु.सानिया गावस,सांस्कृतिक सचिव(विद्यार्थी)-कु.अंता गावस,सांस्कृतिक सचिव (विद्यार्थिनी)-कु.जिया रामदास सावंत,क्रीडा सचिव (विद्यार्थी )-कु.वेदांत शिरोडकर,क्रीडा सचिव (विद्यार्थिनी)-कु.दर्शन परब हे आहेत.तसेच वर्गप्रतिनिधी जतीन म्हातो,मनाली सावंत,सर्वम घाडी,कश्वी गावस,प्रिन्स गावस,कौशल मोरजकर,संचिता गोवेकर,राहुल शर्मा,साची भगत,केशवराज सावंत,तमन्ना सावंत हे आहेत.
प्रथम पाहुण्यांनी मंडळाच्या सदस्यांना आणि सर्व वर्गा?च्या वर्ग प्रतिनिधींना शपथ दिली, त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.तदनंतर मंडळाच्या सदस्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कालिदास घाटवळ म्हणाले,विद्यार्थ्यांनी आयुष्यभर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण आणि जबाबदाऱया रुजवल्या पाहिजेत.समाज उपयोगी कार्यात सहभाग घेतला पाहिजे,वेळोवेळी इतरांना मदत केली पाहिजे.सूत्रसंचालन कु.आदित्या सूर्लकर हिने केले तर सौ प्रमिशा सुर्लकर यांनी आभार मानले.









