वृत्तसंस्था/ चेंगओन
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकरात ऐश्वर्य तोमरने हंगेरीच्या झेलान पिकलेरचा 16-12 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारातील पात्र फेरीमध्ये तोमरने 593 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले होते. हंगेरीच्या पिकलेरला रौप्यपदक तसेच हंगेरिच्या इस्टेव्हेनला कांस्यपदक मिळाले. या क्रीडाप्रकारात भारताच्या चेनसिंगला 7 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया तोमरचे भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे (साई) अभिनंदन करण्यात आले आहे. 2022 आएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत तोमरची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग दर्शविला होता.









