प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. हवामान विभागानेही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे जिल्हा पाणीमय झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पाऊस आकडेवारीतही पुढे असताना दिसतोय. कारण पर्जन्यमानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार, १३ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात (१२० मिमी) पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात (१४ मिमी) पडला.
गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ जुलै २०२१ रोजी सर्व तालुक्यातील आकडेवरी ही तीन आकडी आहे. याउलट १ जून २०२२ ते १३ जुलै२०२२ या दरम्यान गेल्यावर्षीच्या आकडेवारीला मागे टाकत लांजा तालुक्यात २६४२ मिमी पाऊस कोसळला आहे. तर रत्नागिरी तालुक्यात पडलेला पाऊस हा १२५८ मिमी आहे. तसेचे गेल्यावर्षी १ जून २०२१ ते १३ जुलै२०२१ या दरम्यान जिल्ह्यातील एकूण पर्जन्यमान १५१२४ मिमी होते, जे सरासरीच्या १६८० मिमी आहे. मात्र यावर्षी१ जून ते १३ जुलै २०२२ या कालावधीत जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान १४२४४ मिमी आहे, जे सरासरीच्या १५८२.६७ मिमी आहे. यावरून गेल्यावर्षीच्या पावसाच्या सरासरीजवळ यंदाचा पाऊस पोहचला आहे. तरी गेल्यावर्षीच्या पावसाच्या अनुभवावारून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Ratnagiri : शिरवली परिसरात गवा रेड्याचा धुमाकूळ