वार्ताहर /उसगांव
तिस्क उसगांव येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या अपोलो फार्मसीचे उद्घाटन पिळये धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंदाचे आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, माजी सरपंच रामनाथ डांगी, माजी उपसरपंच दिनेश तारी, वास्तूचे मालक गौतम प्रभू, मंगलदास प्रभू, पांडुरंग प्रभू, अपोलो फार्मसी समुहाचे गोवा राज्य उपसरव्यवस्थापक कोटेश्वर राव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अपोलो फार्मसी उसगांवात सुरु झाल्याने रुग्णांना रात्री उशिरापर्यंत औषधे मिळतील. उसगांव सारख्या भागात वैद्यकीय क्षेत्रात अपोलोने एक नवीन पाऊल टाकले आहे, असे डॉ. मडकईकर यावेळी बोलताना म्हणाले. अपोला ही औषध पुरवठा क्षेत्रातील एक नामांकित व विश्वसनीय फार्मसी असून उसगांवात त्यांनी शाखा उघडल्याबद्दल रामनाथ डांगी यांनी अभिनंदन केले.









