ऑनलाईन टीम/ तरुण भारत
विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये अशा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. शिवसेनेच्या ११ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी आज कोर्टात सुरु होती. सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतेही निर्णय घेऊ नये असे कोर्टाने सांगितले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रमय्या यांनी आदेश दिला आहे. यावरून सुनावणी लांबणीवर जाणार हे स्पष्ट झाले आहे.
१६ आमदारांना उत्तर देण्याची मुदत उद्या संपणार आहे. मात्र याला कोर्टाने स्थगिती दिली आहे. आजच्या सुनावणीवर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कारण या सुनावणीवरुन राजकीय गणित अवलंबून आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार यावर अवलंबून आहे. सुरवातीलाच कपील सिब्बल, देवदत्ता कामत यांनी नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. असा न्यायालयात मुद्दा त्यांनी मांडला होता. यावर सरन्यायाधीश रमय्या म्हणाले, हे प्रकरण संवैधानिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये घटनात्मक पैलू आहेत त्यामुळे तातडीने यावर निर्णय होवू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
काय आहे याचिका
शिवसेनेतून बंड करणाऱ्या, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या 16 आमदारांना अपात्र करा असं पत्र शिवसेनेच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं. त्यावर या आमदारांनी 48 तासांच्या आत उत्तर द्यावं अशी नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जारी केली होती. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
अपात्रतेची टांगती तलवार असलेले हे 16 आमदार कोण?
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.