प्रतिनिधी /तिसवाडी
आपल्या जीवनासाठी ज्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे, त्यामध्ये झाडांचीही खूप आवश्यकता आहे. आपल्या पूर्वजांनी काबाडकष्ठाने झाडे जगविली, वाढविली म्हणून आज आपल्याला त्यांची सुमधूर फळे चाखायला मिळतात, हे लक्षात ठेवून आजच्या पिढीनेही आपल्यापरिने झाडे लावून पुढच्या पिढीसाठी हे नैसर्गिक संचिताचे संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन करमळीचे माजी सरपंच उत्तम मुरगावकर यांनी केले.
वनखाते, करमळी ग्रामपंचायत, श्रीमती सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूल यांच्यासहभागो आयोजित करण्यात आलेल्या वनमहोत्सवात ते बोलत होते. यावेळी वन खात्याचे अधिकारी जेबेस्तीन ए., जॉन फर्नांडिस, अभिषेक नाईक, सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच काही ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावातील अनेक ठिकाणी माणसाला उपयुक्त ठरणारी झाडे लावण्यात आली.









