पाण्याची आवक वाढली, पाणीसाठा २८.५३ टीएमसी
नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुसळधार पावसाने रविवारी सकाळी आठपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात प्रतिसेकंद ३८ हजार१९४ क्यूसेक्स पाण्याची वाढ झाली. परिणामी एका रात्रीत कोयनेच्या पाणीसाठ्यात 2.5 टीएमसी इतक्या पाण्याची वाढ होऊन तो रविवारी सकाळी आठपर्यंत २८.५३ टीएमसी इतका झाला आहे.
अधिक वाचा- राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणाच्या पाण्यापातळी वेगाने वाढत आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी आठपर्यंत कोयनानगर येथे १५१ (११०२), नवजा येथे १९४ (१४६३) आणि महाबळेश्वर येथे १७७ (१४२०) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रतिसेकंद ३८ हजार १९४ क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी २०७३.८ फूट वाढली. अद्याप पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.