मालवण/प्रतिनिधी-
मालवण कसाल राज्यमार्गावरील मालवण शहर आणि कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या सीमेवरील रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. मालवणहून कुंभारमाठच्या दिशेने असलेल्या चढावावरील वळणारच रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या डाव्या बाजुला बरीचशी खडी रस्त्यावरच साचून आहे. रस्त्यावरील ही धोकादायक स्थिती टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.









