प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझड झाली आहे. विविध भागांत जाणाऱया रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत केली. सकाळपासून धुवांधार पाऊस लागत आहे. मध्यंतरी काही प्रमाणात वादळी वारा झाल्यामुळे विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पडझड झाली.
वाळपई अग्निशामक दलाचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई धावे दरम्यानच्या रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. तत्काळ अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन झाड हटविले. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. यावेळी दलाचे जगदीश गावडे, सुधाकर गावकर, अशोक नाईक, आनंद शेटकर यांनी चांगल्या प्रकारचे कार्य केले.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील शिंगणे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या शेजारी असलेल्या घरावर झाड पडल्यामुळे वीस हजार रुपयांची हानी झाली. सदर झाड घराच्या एका बाजूला पडल्यामुळे मोठी नुकसानी झाली नाही. मात्र घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने सदर ठिकाणी धाव घेऊन घरावर पडलेले झाड दूर करण्यास यशस्वी भूमिका केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या यंत्रणेला मदत केली.
त्याचप्रमाणे वाळपई शहरातून ग्रामीण भागामध्ये जाणाऱया अनेक रस्त्यांवर छोटीमोठी झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. काही प्रमाणात वीज वाहिनींची नुकसानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. सध्यातरी कोणत्याही ठिकाणी वीजपुरवठा ठप्प झाल्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत मोठय़ा प्रमाणात सुरू होता. रात्री उशिरापर्यंत अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास अनेक ठिकाणी पडझड होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे.









