ऑनलाईन टीम/ तरुण भारत
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मागणीवरून मविआने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यात युती सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. दरम्यान भाजपाने (Bjp) पुन्हा रचना कराव्या अशी मागणी केली आहे. या संदर्भात बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. (Chandrashekhar Bawankule News)
हेही वाचा- Kolhapur; पंचगंगेची मच्छिंद्री आता आठवणीपुरती..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा- भाजपाचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही- संजय राऊत
यावेळी बोलताना बावनुकळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रभाग रचना या अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून घेतल्याने त्यावर हजारो हरकती आल्या आहेत. यामुळे निवडणुकीत मविआ (Mahavikas Aghadi)उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करावी. या प्रभाग रचना, गन रचना सदोष आहेत त्यामुळे त्या रद्द करून नव्याने करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.