पर्ये/वार्ताहर
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे गोवा क्षेत्रीय केंद्र व रवींद्र भवन-सांखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवार दि. 9 जुलै रोजी संध्याकाळी 6 वा. ‘भक्ती-रंग’ या भक्ती संगीत मैफिलीचे आयोजन सांखळी रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात करण्यात आले आहे.
रवींद्र भवन सांखळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. दत्तगुरु आमोणकर यांनी ही माहिती दिली. यावेळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
पं. शौनक अभिषेकी व श्रीमती अनुराधा कुबेर हे गायक कलाकार या मैफीलीचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या भक्ती-रंग मैफीलीत या कलाकारांना राया कोरगावकर (ऑर्गन), दत्तराज सुर्लकर (संवादीनी), विभव खांडोळकर (तबला), किशोर तेली (पखवाज) व सागर पेडणेकर (टाळ/मंजीरी) यांची साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन गोविंद भगत करणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनास उपस्थित राहणार असून दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवतील. रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, सदस्य सचिव दीपक वायंगणकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. सदर संगीत मैफील संगीतप्रेमी रसिकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. कोविड संदर्भात जारी केलेल्या नियमावलीचे पालन उपस्थित राहणाऱया सर्व संगीत प्रेमी रसिकांनी करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पं. शौनक अभिषेकी

स्व. जितेंद्र अभिषेकीचे सुपुत्र व शिष्य पं. शौनक यांनी श्रीमती कमल तांबे यांच्याकडेही गायनाचे मार्गदर्शन घेतले आहे. शास्त्रीय संगीत तसेच नाटय़गीत, अभंग गायन, ठुमरी व टप्पा हे गायन प्रकारही त्यांनी आत्मसात केले आहे. तरंगिणी सांस्कृतिक प्रति÷ानच्या माध्यमातून त्यांनी अनेक संगीत महोत्सव, उगवत्या गायक कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान आणि ज्ये÷ कलाकारांना अर्थसहाय्य केले आहे. देशविदेशात कार्यक्रम सादर करतानाच त्यांच्या सांगितिक यात्रेत अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.
अनुराधा कुबेर

अनुराधा कुबेर या भेंडी बाजार घराण्याचे ख्यातनाम गुरु पं. टी. डी. जानोरीकर व संगीत तज्ञ डॉ. अरविंद थत्ते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आकाशवाणीच्या त्या ’अ’ श्रेणीच्या मान्यताप्राप्त गायक असून शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत व सुगम संगीत गायन प्रकार समर्थपणे सादर करणाऱया कलाकारांत त्यांची गणना होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिफिती व अल्बम निघाले असून प्रति÷sचे पुरस्कार त्यांच्या संगीत साधनेसाठी प्राप्त झाले आहेत.









