गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची अधिकाऱयांना सूचना : राज्यात पोलिसांसाठी घरे बांधण्यात येणार
प्रतिनिधी /बेळगाव
दिल्लीच्या धर्तीवर बेळगाव येथील पोलीस म्युझियमची उभारणी करण्याची सूचना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी पोलीस अधिकाऱयांना केली. बुधवारी आपल्या बेळगाव दौऱयात गृहमंत्र्यांनी पोलीस म्युझियमला भेट देऊन पाहणी केली.
म्युझियमची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरग ज्ञानेंद्र म्हणाले, नागरिकांचे जीव वाचविताना बलिदान दिलेल्या पोलिसांची छायाचित्रे म्युझियममध्ये असावीत. त्यांनी दाखविलेले धाडस व त्याग इतरांसाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
पोलीस दलाच्या विकासासाठी आवश्यक अनुदान दिले जात आहे. बेळगाव जिल्हय़ातील दोन पोलीस स्थानकांचे उद्घाटन करण्यात येत आहे. लवकरच 100 हून अधिक नव्या पोलीस स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. 2 हजार कोटी रुपये खर्च करून राज्यात पोलिसांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
दोन बेडरूमची घरे बांधण्यात येणार आहेत. सध्या 164 घरांची उभारणी जिल्हय़ात प्रगतिपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस आयुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी आदी वरि÷ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
5 हजार पोलीस कॉन्स्टेबलची लवकरच भरती करणार
सरळ वास्तूचे चंद्रशेखर गुरुजी यांच्या खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रामदुर्ग पोलिसांनी संशयितांना अटक करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुरुवारी त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सायबर क्राईम विभाग अधिक बळकट करण्यात येणार असून लवकरच 5 हजार पोलीस कॉन्स्टेबल भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी पारदर्शक तपास सुरू आहे. वरि÷ पोलीस अधिकाऱयांनाही अटक झाली आहे. विरोधीपक्ष नेत्यांचे म्हणणे किंवा आरोप काहीही असले तरी योग्य तपास सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.









