
बेळगाव शहरात 48 हजार पथदीप आहेत. या पथदीपांना वीजपुरवठा केल्या जाणाऱया विद्युतवाहिन्या व खुले असणारे मीटर बॉक्स जीवघेणे ठरत आहेत. बऱयाच ठिकाणी पथदीप सुरू व बंद करण्यासाठी वायर उघडय़ावर ठेवण्यात आल्या असून, पकडीच्या साहाय्याने चालू व बंद केल्या जात आहेत. बहुतेक ठिकाणी वायर खराब झाल्या असून कोणाचा स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. पथदीप व्यवस्थापन करणे ही पूर्णतः कंत्राटदाराची जबाबदारी असताना महानगरपालिकेकडून प्रतिवषी अडीच ते तीन लाख खर्च केला जातो. शहरातील पथदीपांची अवस्था पाहता हा निधी पाण्यात गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









