अंदमान
अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी पहाटे 2 वाजून 54 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.4 इतकी नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र पोर्ट ब्लेयरपासून 244 किलोमीटर अंतरावर 30 किलोमीटर खोलवर जमिनीत होते. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची आर्थिक तसेच जीवित हानी झालेली नाही. अंदमान-निकोबारमध्ये यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.









