ऑनलाईन टीम/ तरुण भारत
नागपूर : राज्यात शिंदे-भाजप युती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच शपथविधी झाला. तसेच दोन दिवसाचे अधिवेशन संपवून एकनाथ शिंदे ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. तर देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात फडणवीस समर्थकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फडणवीसांची विजयाची रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत अमृता फडणवीस देखील आहेत. नागपुरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. ‘जनादेश मिळूनही पक्षादेश पाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ (Devendra Fadanvis) अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. हि रॅली विमानतळापासून त्यांच्या घरापर्यंत नेण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात दाखल झाल्य़ानंतर त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी जबाबदारीची जाणीव असल्याचे म्हटलं. उपमुख्यमंत्री पद दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी होती. त्यांनी मोठा त्याग केला असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. फडणवीसांनावर पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन जबाबदाऱ्या आहेत. फडणवीसांची राजकीय कारकीर्द नागपुरातून सुरु झाली. विदर्भ हा फडणवीसांचा गड आहे. २०१४ च्या निवडणूकीत ६२ पैकी ४४ आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत आमदार कमी झाले. मात्र विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून येऊ शकतात याची खात्री फडणवीसांनी आहे. यासाठी आजची रॅली हि शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. या रॅलीत माजी खासदार, आमदारांनी हजेरी लावली आहे.
हेही वाचा- रायगडात पूरस्थितीची शक्यता? NDRF च्या तुकड्या तैनात, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
फडणवीसांनी मानले आभार
नारपूरकरांनी मला पाच वेळा निवडून दिलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र, विदर्भाला चिंता करण्याची गरज नाही. सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेवू असेही ते म्हणाले. हा जल्लोष म्हणजे नागपूरकरांचे प्रेम आहे. जल्लोष आहे पण जबाबदारीची जाणीव आहे असेही ते म्हणाले.