वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या गटात यजमान भारत आपला तिसरा संघ उतरविणार असल्याची माहिती रविवारी अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
भारतात प्रथमच होणाऱया बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या गटात आतापर्यंत 187 संघांची विक्रमी नोंद झाली आहे. यजमान भारताला तिसरा संघ खुल्या गटात उतरविण्यासाठी फिडेने रितसर मान्यता दिली. भारताच्या या तिसऱया संघामध्ये ग्रॅण्डमास्टर सुर्यशेखर गांगुली, के. मुरली, एसपी. सेतुरामन, अभिजीत गुप्ता आणि अभिमन्यू पुराणिक यांचा समावेश आहे. या तिसऱया संघाचे नेतृत्व तेजस बाक्रे करणार आहे. भारताच्या अ संघामध्ये विदित गुजराती, पी. हरीकृष्णा, एस.एल. नारायणन, अर्जुन के. शशीकिरण यांचा समावेश आहे. भारताच्या ब गटामध्ये निहाल सरीन, डी गुकेश, बी.अधिबन, आर. प्रग्यानंद आणि रोनक साधवानी यांचा समावेश आहे.









