देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच कानात सांगितलेलं एेकल असतं तर तेव्हाच वेगळं चित्र दिसलं असतं. सुधीर मुनगंटीवार यांच्या टिप्पणीला मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यूत्तर दिलं. तसेच राहुल नार्वेकरांचं त्यांनी अभिनंदन केलं. प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा यांचं पालन कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांनी नार्वेकरांच्या सोबतीच्या काही आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, कायद्याचे शिक्षण घेताना मी मित्र म्हणून त्यांच्याकडे शिकवणीला जात होतो. अनेकदा आम्ही दिल्लीचा एकत्र प्रवास केला आहे. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रेशर टाकण्याचा प्रय़त्न करत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आहेत. नार्वेकर राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत ते आणखी जवळ जाऊ नयेत म्हणून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, प्रथा, परंपरा, प्रतिष्ठांचे पालन तुम्ही कराल तसेच आमच्याकडूनही करुन घ्याल अशी अपेक्षा आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीत त्यांनी उभे राहावे अशी आमची इच्छा होती. पण जागा उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी मावळ मधून उमेदवारी घेतली अशा आठवणींना उजाळा दिली.
राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यात सध्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे. अनेक तरुणांची इच्छा असूनही ते यात येणार नाहीत म्हणून तुम्ही ग्रामीण भागापासून शहरी भागातील सर्व तरुणांचे प्रश्न मार्गी लावाल. तसेच तरुणांना संधी द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे जुने सहकारी आहेत. राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरेंच्य़ा गुरुस्थानी आहेत. त्यामुळे विनाअडथळा कामकाज हीच गुरुदक्षिणा त्यांनी द्यावी आणि राहिलेले आमदारही इकडे पाठवावे अशी मिश्किली शब्दात कोपरकळी हाणली.
Previous Articleजे घडलं त्यामुळे समाधान मिळालं काय ?- अजित पवार
Next Article गादीमध्ये लपवून दारुची तस्करी









