प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी आर्चबिशप राऊल निकोलव गोन्साल्वीस (95) यांचे वृध्दपकाळाने पर्वरी येथील जेएमजे इस्पितळात निधन झाले. गेले 10 दिवस ते तेथे उपचार घेत होते. गोव्याचे आर्चबिशप म्हणून ते पहिले गोमंतकीय पॅथलिक होते. गोव्याचे माजी आर्चडायोसेज म्हणून त्यांनी सुमारे 72 वर्षे सेवा दिली. त्यांचा जन्म 15 जून 1927 रोजी झाला होता. 21 डिसेंबर 1950 रोजी ते ख्रिस्ती धर्मगुरू बनले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विद्यमान आर्चबिशप फ्ढिलीप नेरी फ्sढर्रांव यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुखवटा प्रकट केला आहे.
आल्त पर्वरी येथील क्लर्जी होम या चर्चमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनार्थ ठेवण्यात आले असून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत त्यांचे दर्शन घेता येईल आणि आदरांजली वाहण्यात येईल असे कळविण्यात आले आहे. अंत्यसंस्काराची तारीख कालांतराने जाहीर करण्यात येणार असून तोपर्यंत पार्थिव पर्वरीच्या चर्चमध्येच ठेवले जाणार आहे. त्यांनी गोव्यासह देशातील चर्चसाठी मोठे योगदान दिले असून अनेक धर्मगुरूनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी विविध चर्चच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले होते आणि तेथील समस्या, प्रश्न सोडवले होते. शांतता, सलोखा यासाठी त्यांनी भरीव कार्य केल्याची माहिती देण्यात आली.








