प्रतिनिधी /म्हापसा
स्व. मास्टर कृष्णा भिकू आजगावकर विसावे संगीत संमेलन कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने रविवार दि. 3 जुलै रोजी दु. 3.30 पासून खोर्ली म्हापसा येथील सातेरी प्रेक्षागार सभागृहात होणार आहे. या संमेलनात तिघां कलाकारांचा सत्कार केला जाणार असून या कार्यक्रमाचे निवेदन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत करणार आहेत. अशी माहिती आयोजकांच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष शेखर नागडे व सचिव भिकू आजगावकर यांनी दिली.
दु. 3.30 वा. गणेश पार्सेकर, उल्हास वेलिंगकर, प्रेमानंद शेट वेलिंगकर, महाबळेश्वर च्यारी, आनंद मोरजकर, देवीदास कारेकर, प्रकाश काकतकर, विनयाक चिबडे व एकनाथ गोवेकर यांचे भजन, सायं. 4.30 वा. ज्येष्ठ तबलावादक सूर्या शेटय़े यांच्याहस्ते संमेलनाचे विधिवत उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ तबलावादक प्रा. गोरख मांद्रेकर असून प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, खोर्ली येथील सातेरी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नारायण कारेकर, प्रमुख वक्ता योगशिक्षक नारायण राठवड, सातेरी देवस्थानचे अध्यक्ष उमेश तिवरेकर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ तबलावादक सूर्या शेटय़े, भजन गायक गणेश पार्सेकर व काशिनाथ आर्लेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात येईल. सायं. 5.30 वा. किरण रायकर यांचे शास्त्रीय गायन, 6.15 वा. प्रणव अवधूत च्यारी यांचे सतारवादन, 6.45 वा. भाग्यश्री आठल्ये-जोशी यांचे गायन होईल.
कलाकारांना संवादिनीवर शेखर नागडे, नीलेश गोवेकर, ऑर्गनवर शिवानंद दाभोलकर, तबल्यावर सूर्या शेटय़े, रोहिदास परब, शैलेंद्र पाळणी, कौस्तुभ च्यारी, प्रसाद कळंगुटकर, निशिकांत कळंगुटकर तर मंजिरीवर प्रेमानंद शेट वेलिंगकर साथसंगत करतील.









