कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे
प्रतिनिधी /तिसवाडी
उटा संघटनेच्या संस्थेमध्ये समाजबांधवाना एकत्रित करण्याचे काम प्रत्येकांनी केले पाहिजे. समाजामध्ये आपलेपणा सातत्याने उभा राहण्याची धमक असली पाहिजे. आपले माजी मंत्री डॉ. काशिनाथ जल्मी यांनी देखील उटासंदर्भात खुप मोठे योगदान दिले आहे म्हणून प्रत्येकानी कोणा भाटकारना न घाबरता, न डगमगता प्रत्येक काम, योजना उटा संस्थेमार्फत केल्यास त्यास आम्ही सदैव आपल्या बरोबर राहिन, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
गावांतवाडा कुंभारजुवे येथे सरकारी प्राथमिक विद्यालय प्रांगणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री व उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, तिसवाडी तालुक्यातील उटा संघटना अध्यक्ष भालचंद्र उसगावकर, व्हीपीके अर्बन कॉ. ऑप सोसायटीचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, विश्वास गावडे, सुभाष कुट्टीकर, मोहन घाडी,
सतीश सर, माजी सरपंच व पंच सदस्या निशिता गावडे, देऊ गावडे, दामु बांदोडकर, कारापूरकर भाऊ इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रात माजी मंत्री प्रकाश वेळीप म्हणाले की, आमचा 9 ऑगस्ट रोजी उटाचा वर्धापनदिन राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे साजरा करण्याची आमची तयारी आहे. तेव्हा येथील माझ्या समाजबांधवांनी हजर रहावे, अशी विनंती केली. यावेळी विश्वास गावडे, दुर्गादास गावडे यांचेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत देऊ गावडे यांनी केले. सुत्रसंचालन उमेश खोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र बांदोडकर यांनी मानले. या सभेला मोठय़ा प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती.









