दीड वर्षात काम पूर्णत्वाकडे येईल- जोशुआ डिसोझा
प्रतिनिधी /म्हापसा
गेली अनेक वर्षे वाट पाहत असलेल्या म्हापशातील भूमिगत वीज वाहिन्याच्या कामाचा शुभारंभ म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्याहस्ते करण्यात आला. सुमारे 117 कोटी रुपये खर्चून म्हापशात सर्वत्र भूमिगत वीज वाहिन्याचे काम हाती घेण्यात आले असून 2023 पर्यंत दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेवक सुशांत हमरलकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, विराज फडके, भाजपा मंडळ अध्यक्ष योगेश खेडेकर, नगरसविका प्रिया मिशाळ, कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर, एई नॉर्मन आथाईद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, आंगण म्हापसा जुने आझिलो इस्पितळाकडून हे काम सुरू होत आहे. 117 कोटीचे काम आहे. येत्या दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्णत्वाकडे येणार आहे. काही ट्रान्सफोर्मरही बदलण्यात तसेच स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. यामुळे पुढे आता सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. आम्ही वीजबाबत गंभीर आहेत. मुख्यमंत्री व वीज मंत्र्याचा आम्हाला याकामी पूर्णतः पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
जनतेने खोदकामावेळी सहकार्य करावे- प्रदीप नार्वेकर
कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर म्हणाले की, 77 नवीन ट्रान्सफॉर्मर म्हापशात बसविण्यात येणार आहे. वीज खात्याद्वारे एलसीडी मॅथड सुरू करण्यात आला आहे. याद्वारे सर्व रस्ता खोदण्याची गरज नाही. 40 किलोमीटर यासाठी आहे. एकीकडे राहून खड्डा मारून याद्वारे 400 ते 500 मीटर दरम्यान वीज लाईन भूमिगत नेली जाते. जिल्हाधिकाऱयांनी यासाठी आम्हाला 3 महिन्याचा अवधी दिला आहे. 40 किलोमीटरचे काम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नार्वेकर यांनी केले.









