ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या नावावार शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम लागला. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालयं. ( legislative Assembly Speaker Election 2022 Rahul Narvekar News)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशनं एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले असून येत्या रविवार आणि सोमवारी हे अधिवेशन होणार आहे. याअधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड देखील केली जाणार आहे.
हेही वाचा- भाजपच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब..?
राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द
राहुल नार्वेकरांची राजकीय सुरुवात ही शिवसेनेतून झाली आहे. तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांनी आता भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे.