प्रतिनिधी /बेळगाव
सफाई कर्मचाऱयांना येत्या सात दिवसांत वसतिगृहाची हक्कपत्रे दिली जातील. जे मैलावाहू स्वच्छता कर्मचारी होते त्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
जिल्हय़ामध्ये सध्या कोणीही मैलावाहू सफाई कर्मचारी नाहीत. आतापर्यंतच्या गणतीमध्ये कोणीही आढळले नाही. आढळल्यास निश्चितच त्यांचा विचार करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी माहितीही देण्यात आली. 1973 च्या पूर्वी तसेच त्यानंतर जे मैलावाहू स्वच्छता कर्मचारी होते त्यांच्या वारसांना हक्कपत्रे दिली जाणार आहेत. मात्र जो सफाई कर्मचारी निवृत्त झाला आहे त्यांनी सरकारी घरे सोडणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. सफाई करण्याचे कंत्राट अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव ठेवण्याबाबत सरकारचा कोणताही आदेश नाही. त्यामुळे कोणालाही हे कंत्राट दिले जाते. आनंदवाडी येथील पी. के. क्वॉर्टर्स येथे जीम तसेच ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर मागविल्याची माहिती आयुक्त डॉ. रुदेश घाळी यांनी दिली. बैठकीला मुख्य कार्य. अधिकारी दर्शन एच. व्ही., उमा सालीगौडरसह अधिकारी उपस्थित होते.









