वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
आगामी इंडियन सुपरलीग फुटबॉल हंगामासाठी ओडिशा एफसी संघाने भारताचा माजी फुटबॉलपटू क्लिफोर्ड मिरांडाची सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
2000 ते 2015 या कालावधीत क्लिफोर्ड मिरांडाने राष्ट्रीय फुटबॉल लीग स्पर्धेत गोव्याच्या धेंपो संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.. 39 वर्षीय मिरांडाची आता ओडिशा एफसी फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती या क्लबच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. ओडिशा एफसी क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी जोसेफ गोंबेयु यांच्यासमवेत आता मिरांडा फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करेल. मिरांडाने 2005 ते 2014 या कालावधीत 45 सामन्यांत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व करताना सहा गोल नोंदविले आहेत.