चंदीगड
पंजाब सरकार आता केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रस्ताव मांडणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी पंजाब विधानसभेत यासंबंधी घोषणा केली आहे. या प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार प्रताप बाजवा यांनी केली होती. तर भाजप आमदार अश्वनी शर्मा यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या मुद्दय़ावरून सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याचे भाजप आमदाराने म्हटल्यावर सदस्यांदरम्यान घोषणाबाजी सुरू झाली. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सैन्यदलांमध्ये 4 वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. याच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शने झाली आहेत.