प्रतिनिधी / ओरोस –
एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोप खाली. देवगड तालुक्यातील एका गावातील अवधूत उर्फ जयू शांताराम राणे, अजय विजय राणे, केशव महादेव राणेया तिघांना विशेष जिल्हा न्यायाधीश यांनी दोषी ठरवले आहे. त्यामुळे या प्रकरणी अवधूत आणि अजय याना प्रत्येकी २० वर्षे तर केशव याला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.