मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या खात्याचं फेरवाटप करण्यात आले आहे. यामध्ये मंत्री, राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. जनहिताची कामे अडकू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
मंत्र्याकडील खातेवाटपात बदल :
१) एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे.
2)गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे.
3)दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे.
4)तर उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:
१)शंभूराज देसाई यांच्याकडील खाते संजय बाबुराव बनसोडे यांच्याकडे दिले आहे.
२)राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज पाटील यांच्याकडे दिली आहेत.
३)राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडील खाती प्राजक्त तनपुरे, सतेज पाटील,आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत.
४)अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती प्राजक्त तनपुरे, सतेज पाटील, आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत.
५)बच्चू कडू, यांच्याकडील खाती आदिती तटकरे, सतेज पाटील, संजय बनसोडे, दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









