वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या फिफाच्या विश्व मानांकन यादीत भारताला 104 वे स्थान मिळाले आहे. या मानांकन यादीत भारताचे स्थान दोन अंकानी वधारले आहे. यापूर्वी भारत 106 व्या स्थानावर होता.
फिफाच्या महिलांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय महिला फुटबॉल संघाचीही सुधारणा झाली असून आता भारत 56 व्या स्थानावर आहे. या यादीत भारतीय महिला फुटबॉल संघ यापूर्वी 59 व्या स्थानावर होता. पुरूषांच्या मानांकन यादीत न्यूझीलंड 103 व्या स्थानावर आहे. मात्र एएफसीच्या ताज्या मानांकन यादीत भारताचे स्थान कायम राहिले असून हा संघ 19 व्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत इराण पहिल्या स्थानावर आहे.









