ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील झालेली बंडखोरी ही भूकंप नाही, हे घडणारचं होतं. वेगवेगळ्या पक्षातील प्रतिनिधींनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय आहे. निवडून आलेल्या पक्षातील आमदारांना विचारून त्याचवेळी निर्णय घेतला असता तर गठबंधन झालं नसतं. हे गठबंधन सत्ता स्थापनेकरता झालेले अनैसर्गिक आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नव्हते अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. सेना आमदारांना निर्णय घ्यावा लागेल. हे सरकार जवळजवळ पडलेलचं आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोकं राहतातं. ज्यावेळी परकीय आक्रमण झाली तेव्हा कोणी घाबरुन भिक घातली नाही. आणि आजही बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता भीक घालणार नाही. जे धमकी देत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय लोकं गप्प बसणार नाहीत असेही ते म्हणाले.