वाळपई रुग्णालयात 250 रुग्णांची तपासणी : दर बुधवारी गोमेकॉच्या डॉक्टराची उपस्थिती लाभणार
प्रतिनिधी /वाळपई
गोवा मेडिकल कॉलेज व आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात आजपासून घेण्यात आलेल्या सॅटेलाईट ओपीडीला चांगला प्रतिसाद लाभला.
आज एकाच दिवशी जवळपास 250 रुग्णांनी वेगवेगळय़ा प्रकारची तपासणी करून घेतली. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येणार असून त्यांची प्राधान्याने उपचार प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आजचा प्रयोग यशस्वी झालेला आहे. दर बुधवारी गोवा मेडिकल कॉलेजचे विविध विभागाचे सीनियर डॉक्टर रुग्णालयात घेऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. यामुळे रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून गोवा मेडिकल कॉलेज व आरोग्य खाते यांच्या संयुक्त पद्धतीने चांगल्या प्रकारे काम होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी की, सत्तरी तालुक्मयातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे गोवा मेडिकल कॉलेज व आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर सॅटेलाईट ओपीडी हा नवीन उपक्रम वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात सुरू करण्यात आला. दर बुधवारी गोवा मेडिकल कॉलेजचे वेगवेगळे डॉक्टर या रुग्णालयात येऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. ही तपासणी बुधवारपासून सुरू करण्यात आली. यामध्ये पेडियाट्रिक, ऑर्थोपेडिक्स, गायनॅकॉलॉजिस्ट, सर्जन व फिजिशियन विभागातील तज्ञ डॉक्टर आजपासून वाळपईत सेवेसाठी तत्पर झाले.
यासंदर्भातील चांगली जनजागृती झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील रुग्ण सकाळपासून नोंदणी करण्यासाठी जमले होते. स. 10 वा. या तपासणी प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुमारे 250 रुग्णांनी वेगवेगळय़ा प्रकारची तपासणी करून घेतली. पैकी 15 जणांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. गीता काकोडकर यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
दर बुधवारी ओपीडी सुरू राहणार : डॉ. कल्पना महात्मे
या संदर्भात विशेष लक्ष देण्यासाठी आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर या एकूण कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. कल्पना महात्मे, वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत वाडकर, ज्ये÷ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या खास सचिव डॉ. राजनंदा देसाई यांची उपस्थिती होती.
बुधवारपासून शस्त्रक्रिया सुरू : डॉ. गीता काकोडकर
गोव्यात असा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला आजचा उपक्रम हा यशस्वी ठरलेला आहे. ज्याप्रमाणे रुग्णांनी दिलेल्या प्रतिसादावरून हा उपक्रम प्रक्रिया पुढे सुरूच राहणार असल्याचे यावेळी गीता काकोडकर यांनी सांगितले. पुढील बुधवारपासून याठिकाणी शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात आलेला आहे, असे यावेळी गीता काकोडकर यांनी स्पष्ट केले.
नोडल अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सत्तरी तालुक्मयातील रुग्णांनी या सुविधेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याचे सांगितले.









