मुंबई : नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. जवळपास पंधरा मिनिटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. मी कोणताही वेगळा पक्ष काढलेला नाही, पक्षांतर ही केलं नाही, मला कोणत्या मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. तरीही माझ्यावर विधिमंडळातील गटनेते पदावरून का हटवण्यात आलं? असा रोख सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्यानंतर काही प्रश्न देखील शिंदे यांनी उपस्थित केलेत. तसेच शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या तक्रारी केल्याचे समजते. मला कोणत्याही मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की, हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती व्हावी, ही इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे. पण माझ्याबद्दल ज्या बातम्या बाहेर दिल्यात जात आहेत त्या चुकीचे आहेत. अपहरणाचे आरोप माझ्यावर करण्यात येत आहेत. आता पुढे काय करायचं? ते मी अधिकृतपणे सांगतो. असेही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








