बेळगाव : युवा सेनेच्यावतीने शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावसह खानापूर, निपाणी येथून युवा सैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
युवा सेनेने मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा निश्चय केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्त्वाखाली 27 जून रोजी काढण्यात येणाऱया मोर्चाला मोठय़ा संख्येने युवा सैनिक उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









