वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील येथे झालेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत इटलीच्या मॅटो बेरेटिनीने एकेरीचे जेतेपद पटकाविताना सर्बियाच्या क्रेजिनोव्हिकचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बेरेटिनीने क्रेजिनोव्हिकचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत क्विन्स क्लब टेनिस स्पर्धेचे दुसऱयांदा विजेतेपद पटकाविले. एटीपीच्या मानांकनात बेरेटिनी सध्या 10 व्या स्थानावर आहे. अलिकडच्या कालावधीत ग्रासकोर्ट स्पर्धामध्ये बेरेटिनीने 21 पैकी 20 सामने जिंकले आहेत. गेल्या महिन्यात बेरेटिनीने स्टुटगार्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती.









