वृत्तसंस्था/ बर्लीन (जर्मनी)
टय़ुनेशियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू जेबॉरने रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील बर्लीन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ऑस्ट्रेलियाच्या बेनसिकचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जेबॉरने बेनसिकचा 6-3, 2-1 असा पराभव केला. या सामन्यात दुसरा सेट चालू असताना बेनसिकच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने तिने हा सामना अर्धवट सोडला. बेनसिकने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. बर्लीन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद सँडर्स आणि सिनियाकोव्हा यांनी पटकाविताना अंतिम सामन्यात बिगर मानांकित जोडी कॉर्नेट आणि टिचमन यांचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या सँडर्सचे दुहेरीतील हे चौथे विजेतेपद आहे.









