अभिनेत्री सई पल्लवीचे स्पष्टीकरण
काश्मिरी पंडितांबद्दल केले होते वादग्रस्त विधान
दक्षिणेतील अभिनेत्री सई पल्लवीने काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिआ शेअर केला आहे. यात तिने माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून माझा उद्देश केवळ हिंसेची निंदा करणे होता असे म्हटले आहे.
कुठल्याही गोष्टीप्रकरणी लोकांना स्पष्टीकरण देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. पुढील काळात कुठल्याही मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी दोनदा विचार करणार आहे. माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला जातो अशी भीती आहे. स्वतःचे विचार विलंबाने मांडण्याप्रकरणी मी माफी मागत असल्याचे सईने म्हटले आहे.

स्वतःच्या 14 वर्षांच्या शालेय जीवनात मी केवळ एकच वाक्य नेहमी म्हणायचे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. मला माझ्या देशाची संस्कृती आणि वैविध्यातील एकतेवर अत्यंत प्रेम आहे असे मी नेहमी म्हणत होते. आम्ही कधीच स्वतःची ओळखीला जात किंवा धर्मात विभागले नाही. मी माझी भूमिका अत्यंत तटस्थ राहूनच मांडत असते असे सईने म्हटले आहे.
काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यावर मी दुःखी झाले होते. काश्मीरमधील संकटामुळे प्रभावित लोकांना मी कधीच कमी लेखणार नाही. हिंसा कुठल्याही स्वरुपात चुकीची असल्याचे माझे मानणे असल्याचे सई म्हणाली. काश्मिरी पंडितांची तुलना मॉब लिंचिंगशी केल्याप्रकरणी सईला ट्रोलिंगला तोंड द्यावे लागले होते. अभिनेत्रीच्या विरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला होता.









