वार्ताहर/कसाल-
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा बुधवार 15 जून पासून सुरू झाल्या. कुडाळ तालुक्यातील कसाल बाजारपेठ येथील जीवन शिक्षण मंदिर कसाल नंबर 1, या शाळेमध्ये तब्बल दीडशेच्यावर पटसंख्या असून, या शाळेसाठी नवीन इमारत मिळाली आहे. मात्रविद्यार्थ्यांना आवश्यक असलेले स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच झालेली नाहि. त्यामुळे मुलांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ न झाल्यास सर्व विद्यार्क्षी घेऊन जिल्हा पाfरषद प्रशासन अधिकाऱयाच्या समोर शाळा भरविली जाईल, असा इशारा मुलांच्या स्वागताच्या वेळी जाधव यांनी दिला आहे.









