ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानपरिषद निवडणुकीची (MLC Election) रणनीती ठरली आहे. चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय हे महाराष्ट्र पाहिलं. निवडणुकीत मतं बाद होणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. यासंदर्भात सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज सर्व आमदारांना (MLA) मतदानाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच मतांचा कोटा जास्त कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदान बाद होणार नाही याचीही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तसेच निवडणुकीच्या संदर्भात आज संध्याकाळी आमदारांची बैठक घेणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांना महत्त्व आलं आहे. लोकशाहीत आरोप-प्रत्यारोप करून मार्ग निघत नाहीत. काही पक्षांनी अपक्षांशी संपर्क साधला हे खरं आहे. अपक्षांकडे सन्मानाने मत मागायला पाहिजे, असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी दिला. तसेच जो २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल, असेही पवार म्हणाले.