योग दिनादिवशी 25 तास पाण्यावर तरंगत राहणार
प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय योगदिन व आझादी का अमृतमहोत्सवचे औचित्य साधून 21 जून या योग दिनादिवशी योगपटू संजीव हंचीनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगत राहून योग करणार आहेत. 20 जून रोजी सायंकाळी 4.30 वा. या उपक्रमाला सुरुवात होणार असून 21 जून रोजी सायंकाळी 5.30 वा. त्याची सांगता होणार आहे.
काहेर विद्यापीठ, स्वीमर्स क्लब, ऍक्वेरिअर्स स्वीमिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई सुवर्ण जेएनएमसीच्या जलतरण तलावात हा उपक्रम ते करणार आहेत. या उपक्रमादरम्यान दर चार तासांनी ते 10 मिनिटांची विश्रांती घेणार आहेत. तसेच अन्य 24 जलतरणपटू प्रत्येकी एक तास पाण्यावर योगा करून त्यांना सहकार्य करणार आहेत. तसेच अन्य 25 जतरणपटू जलतरण करणार आहेत. योगप्रेमी व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.









