प्रतिनिधी /बेळगाव
केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या रक्तपेढीत बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या सहयोगाने मंगळवारी रक्तदान शिबिर झाले. यावेळी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
कोरे हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. श्रीकांत वीरगे यांनी प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने रक्तदान केले पाहिजे, असे सांगितले. प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, मृत्यूनंतर त्वचा दान, देहदान आणि नेत्रदान करावे, असे प्रा. डॉ. महांतेश रामण्णावर यांनी सांगितले.
डॉ. बी. बी. देसाई, डॉ. कीर्तन एम. एस., डॉ. अरुण बिरादार, डॉ. रोहन आणि वैद्यकीय विद्यार्थी पार्वतम्मा, अनघा, प्रतिमा आणि विजयलक्ष्मी यांच्यातही अनेकांनी रक्तदान केले.









