प्रतिनिधी /बेळगाव
बबन भोबे मित्रमंडळातर्फे केळकरबाग 9 क्रमांक शाळेतील तसेच अळवण गल्ली, शहापूर येथील दिव्यांग संस्थेतील मुलांना शालेय साहित्य व छत्र्या वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी टॉप इन टाऊनचे मालक राहुल शहापूरकर व मंदा नेवगी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर छत्र्या रोहित देशपांडे यांनी दिल्या आहेत.
या मदतीबद्दल दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष वामन कट्टी यांनी बबन भोबे मित्रमंडळाचे व रोहित देशपांडे यांचे आभार मानले. याचवेळी डॉ. संतोष भोबे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग संस्था व इतर ठिकाणी अल्पोपहार देण्यात आला.









