नवी दिल्ली
आपल्याकडे सीएनजी इंधनाचे वाहन आहे आणि आपण पेट्रोल पंपावरती सीएनजीकरीता मोठी रांग लावत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच सीएनजी इंधनाचा पुरवठा आपल्या घरीच केला जाण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. एका फोन कॉलवर सीएनजी इंधनाचा पुरवठा ग्राहकाच्या थेट घरीच होणार आहे. स्टार्टअप कंपनी फ्युएल डिलिव्हरी यांनी यासंबंधीचा प्रयोग मुंबईत सुरू करण्याचा विचार चालविला आहे. त्याकरिता महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत एक करारही केला असल्याची माहिती आहे.









