वार्ताहर /खानापूर
खानापूर श्री मऱयाम्मादेवी यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर भाविकांची गर्दी होणार आहे. यात्रा यंदा दोन दिवस भरणार असल्याने बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
खानापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री मऱयाम्मादेवीची दरवषी जत्रा भरविण्यात येते. मंगळवारी सकाळपासून देवीचे दर्शन व ओटय़ा भरण्यासाठी महिलावर्ग व भाविकांची गर्दी झाली होती. वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिराच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला फेऱया घालून देवीच्या दर्शनासाठी सुवासिनींनी गर्दी केली होती. मंदिराच्या प्रांगणात यात्रेनिमित्त खेळणी साहित्य, पाळणे व मिठाईची दुकाने थाटण्यात आली असून मंगळवारी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस
मंगळवारी सकाळी 10.30 वाजता गाऱहाणा झाल्यानंतर दिवसभर देवीच्या ओटय़ा भरण्यात आल्या. शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर सदर यात्रा होत असल्याने पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दोन-तीन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावली होती. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यास यात्रेला गर्दी होणार आहे.









