पीएफओधारकांना नॉमिनी आदीबाबत जागृत राहण्याची गरज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारकडून पीएफ खात्याला ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये जर का प्रोव्हिडेंट फंड अकाउंटमध्ये ई-नॉमिनेशन केले नाही, तर संबंधीत खातेधारकांना पीएफ पासबुक बघता येणार नाही. यात ई-नॉमिनेशनशी संबंधीत प्रक्रिया आणि नियमावलीसंबंधी जाणून घेण्याची गरज आहे. याविषयाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
नॉमिनेशन का आवश्यक आहे?
ईपीएफओच्या खातेधारकांसाठी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी फायदा व्हावा यासाठी ई नॉमिनेशन करणे बंधनकारक आहे. यामध्ये कोणत्याही कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास त्याच स्थितीत प्रोव्हिडेंट फंड, पेन्शन, विम्याचा लाभ याबाबत ऑनलाईन दावा पूर्ण करण्यासाठी ई नॉमिनेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे नॉमिनेशन करण्यास संबंधीतानी विसरू नये.
काय आहे ई नॉमिनेशनचा नियम?
हे खाते ज्यांचे आहे त्यांना या खात्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्यांना नॉमिनेट करता येते. कुटुंबच नसल्यास दुसऱया व्यक्तीला नॉमिनेट करण्याची सवलत मिळते, परंतु कुटुंबाचा पत्ता मिळाल्यास अन्य व्यक्तीला नॉमिनेट केल्याचे रद्द होते. नॉमिनीचा उल्लेख न केल्यास कर्मचाऱयांच्या निधनानंतर त्याचा उत्तराधिकारी असणाऱयाला पीएफ सादर करण्यासाठी उत्तराधिकारी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सिव्हील न्यायालयात जावे लागते.
ई-नॉमिनेशनसाठी काय हवीत कागदपत्रे ?
संबंधीत पीएफ खातेधारकांना आधार नंबर, पत्ता, जन्म दिनांक, मोबाईल नंबर, बँक खात्याचा नंबर आणि नॉमिनीचा स्कॅन केलेला फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. फोटो पोर्टलवर अपलोड करावा लागणार. तसेच संबंधीत नॉमिनीची स्वाक्षरी किंवा अंगठय़ाचा ठसा घ्यावा लागेल.








