इमारत बांधकामाला सुरुवात : सव्वा कोटीचा निधी मंजूर
वार्ताहर /खानापूर
खानापूर पोलीस स्थानकाची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. याकरिता गृहखात्याने 1 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर इमारत जवळपास तीन हजार चौरस फूट जागेत उभारली जात आहे. या बांधकामाला प्रारंभही झाला आहे. खानापूर येथील पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने गळती लागून पोलिसांना कामकाज करणे अवघड बनले होते. त्यामुळे या स्थानकाच्या नूतन इमारतीची अनेक वर्षांची मागणी आता दूर झाली आहे.
खानापूर तालुक्मयात नंदगड व खानापूर ही दोन पोलीसस्थानके आहेत. या दोन पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये जांबोटी, लोंढा अशी आऊटपोस्ट आहेत. नंदगड पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. खानापूरला यापूर्वी मंडल पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अशा दोन ठिकाणी कामकाज चालत होते. तालुक्मयात यापूर्वी एका पोलीस निरीक्षकांवर दोन पोलीस ठाण्यांचा कारभार होता. आता एक पोलीस स्टेशन एक निरीक्षक अशी रचना करण्यात आली आहे.
खानापूरला पूर्वी मलप्रभा नदीकाठावरील जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पोलीस उपनिरीक्षकांचे कार्यालय होते. हे कार्यालय काही काळ तालुका पंचायतीच्या आवारात ठेवण्यात आले होते. आता पुन्हा पोलीस दलाने अनेक फेरबदल केल्यानंतर पोलीस ठाण्याचा व्यवहार पोलीस निरीक्षक पाहत आहेत. या आवारात नवीन हायटेक इमारत मंजूर करण्यात आली आहे. यासाठी एक कोटी 24 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून जवळपास तीन गुंठे जागेमध्ये या इमारतीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱयांची कमतरता
खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 101 गावे येतात. त्यमानाने पोलीस कर्मचाऱयांची येथे कमतरता आहे. आता नवीन इमारत झाल्यानंतर क्षमतेनुसार पोलीस भरती व इतर सुविधांच्या पूर्ततेसाठी वरि÷ांकडे पाठपुरावा केला आहे.
– सुरेश शिंगे पोलीस निरीक्षक, खानापूर









