बटाटा दर स्थिर : आवक वाढल्याने टोमॅटो, कोथिंबीर दरात घट
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव प्रति क्विंटलला 400 रुपयांनी वधारला आहे. बटाटय़ाचा दर मात्र स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये मेथी, बटका मिरची, बीट, इंग्लिश गाजर यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. टोमॅटो, कोथिंबीर, गोल भोपळा यांच्या दरात घसरण झाली आहे.
महाराष्ट्रातील कांदा सध्या देशभरामध्ये विक्रीसाठी जात आहे. यामुळे कांद्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे कांदा दरात वाढ होत आहे. यापुढे कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून वर्तविली जात आहे. ज्या बाजारात भाव जास्त मिळत आहे, त्या बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. बेळगाव मार्केट यार्डमध्ये प्रति बाजाराला 50 ते 60 ट्रक कांदा आवश्यक असतोच. शनिवारी बाजारात केवळ 35 ट्रक कांदा आवक झाल्याने लिलावामध्ये चढाओढ होऊन कांद्याचा भाव प्रति क्विंटलला चारशे रुपयांनी वाढल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
इंदोर-आग्रा या ठिकाणाहून कोल्ड स्टोअरेजमधील (शीतगृह) बटाटा विक्रीसाठी येत आहे. शनिवारी इंदोर बटाटय़ाच्या सात ट्रक आवक झाली होती. आग्रा बटाटय़ाच्या दोन ट्रक आवक झाली होती. याचा दर प्रति क्विंटल स्थिर आहे. बटका मिरचीला गोवा, कोकण भागातून मोठय़ा प्रमाणात मागणी
बेळगाव जिल्हय़ासह इतर राज्यांमधून भाजी मार्केटला भाजीपाला आवक येत आहे. मेथी भाजीची आवक किरकोळ आहे. बटका मिरचीला गोवा, कोकण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मोठमोठय़ा हॉटेलमध्ये इंग्लिश गाजरला मागणी असते. यामुळे याचा भाव वधारला आहे. घटप्रभा आणि बेळगाव तालुक्यातून कोथिंबीरची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. परराज्यांतून व इतर जिल्हय़ांमधून टोमॅटो, गोल भोपळा आवक जास्त प्रमाणात येत असल्यामुळे याचा दर कमी झाला असल्याची माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची…….. 500 ते 550 रु.
- इंदस ढबू मिरची.. 450 ते 500 रु.
- बिन्स………….. 500 ते 550 रु.
- कारली………… 300 ते 320 रु.
- वांगी………….. 160 ते 200 रु.
- काटे वांगी……… 200 ते 250 रु.
- दोडकी…………. 300 ते 320 रु.
- कोबी………….. 220 ते 240 रु.
- इंग्लिश गाजर …. 380 ते 400 रु.
- भेंडी…………… 200 ते 220 रु.
- बिट……………. 200 ते 210 रु.
- जवारी काकडी…. 200 ते 300 रु.
- आले…………… 300 ते 320 रु.
- हिरवी मिरची…. 350 ते 380 रु.
- बटका मिरची….. 500 ते 600 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे…. 800 ते 1000 रु.
- दुधी भोपळा प्रति ड. 200 ते 250 रु.
- गोल भोपळा प्रति क्विं.1200 ते 1300 रु
कांदा भाव प्रति क्विंटल
- गोळी………. 1000 ते 1300 रु.
- मीडियम……. 1600 ते 1800 रु.
- मोठवड…….. 1900 ते 2000 रु.
- गोळा 2100 ते 2200 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी………… 1500 ते 2000 रु.
- शेपू…………… 800 ते 1000 रु.
- पालक…………. 400 ते 500 रु.
- कांदापात………. 600 ते 700 रु.
- लाल भाजी…….. 500 ते 600 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 900 ते 1000 रु.
- बेळगाव कोथिंबीर 500 ते 600 रु.
- चायना कोथिंबीर 500 ते 550 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी………….. 500 ते 600 रु.
- मीडियम……. 1200 ते 1600 रु.
- मोठवड…….. 1600 ते 2000 रु.
- गोळा………. 2000 ते 2300 रु.
- इंदोर बटाटा… 1900 ते 2200 रु.
- आग्रा बटाटा 2000 ते 2100 रु









