प्रतिनिधी /पणजी
सांतआंद्रे मतदारसंघातील तसेच संपूर्ण गोव्यातील जनतेला भेडसावणारे विविध विषय ‘रिव्होल्यूशनरी गोवन्स’ पक्षातर्फे (आरजी) पावसाळी विधानसभेत मांडण्यात येणार असून लोकांनी महत्त्वाचे विषय पक्षाकडे पाठवावेत असे आवाहन पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी केले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढे सांगितले की विरोधी पक्षाने जनतेचे हे विषय विधानसभेत गंभीरपणे कधीच मांडले नाहीत त्यामुळे ते तसेच राहीले असून त्यावर उपायही झाले नाहीत. गोव्यात गुन्हेगारी मोठय़ाप्रमाणात वाढत असून अपघातही घडत आहेत. त्यावर नियंत्रण राहीलेले नाही. मोठमोठे प्रकल्प ग्रामपंचायत क्षेत्रात आणले जातात परंतु स्थानिकांना कोण विचारत नाही. विश्वासात घेत नाही अशी परिस्थिती आहे. अधिवेशन म्हणजे आमदारांसाठी खुले व्यासपीठ असून जनतेने त्यांचे प्रश्न पक्षाकडे पाठवावीत त्याची दखल घेतली जाईल असे बोरकर म्हणाले.
गोव्यात विविध भागात झोपडपट्टी वाढत असून त्यांना संरक्षण मिळते. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये तर सावळा गोंधळच आहे, प्रमुख विषय आपण विधानसभेत मांडणार असून लोकांनी mla. standre. gvs. gov. in या ई-मेलवर पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.









