प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा तार नदीच्या पात्रात जी जलपर्णी झाली होती ती हटविण्यास सुरूवात केली असून जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हापशात येऊन या नदीच्या पात्रात असलेल्या जलपर्णीची पाहणी केली होती व ही जलपर्णी 10 जूनपासून हटविण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करीत या कामाचा शुभारंभ म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्याहस्ते नारळ वटवून करण्यात आला.
आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, मंत्र्यांनी आपले आश्वासन पाळले आहे. यावेळी येथील नगरसेवक प्रकाश भिवशेट, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर उपस्थित होते. हे 10 लाखाचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आमदारांनी दिली. ही जलपर्णी त्वरित हटवावी अशी मागणी प्रवीण आसोलकर यांनी केली होती अन्यथा येथे पूर येण्याची भीतीही व्यक्त केली होती व नगराध्यक्षांना निवेदनही सादर केले होते.









