दोन दिवसात समस्यांना न सुटल्यास गंभीर परिणाम.
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या पाच दिवसापासून पिसुर्ले भागातील देवुळवाडा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्था?मध्ये तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत असून दोन दिवसाच्या आत पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्यास वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा सदर भागातील ग्रामस्था?नी दिलेला आहे.
भर पावसातही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती आणखी भयानक होण्याची भीती या ग्रामस्था?नी व्यक्त केलेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सध्या मान्स?नला सुरुवात झालेली आहे. या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत आहे. अशा अवस्थेत पिसुर्ले गावातील देऊळवाड या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. अचानकपणे नळ कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्था?ना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागामध्ये सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्था?नी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे. यासंदर्भात ग्रामस्था?नी दिलेल्या अधिक माहितीनुसार गेल्या पाच दिवसांपासून जवळ कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्था?ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या भागामध्ये सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. यामुळे टॅ?करवर या भागातील ग्रामस्था?ना अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून टॅ?करच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. मात्र हा पाणीपुरवठा कमी पडत असल्यामुळे समस्या निर्माण होत असल्याची माहिती सदर भागातील ग्रामस्थ व पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सभासद देवानंद परब यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. पावसाळी मोसमात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येणाऱया काळात संदर्भात चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भीती देवानंद परब यांनी व्यक्त केलेली आहे. यामुळे दोन दिवसाच्या आत पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्यास त्याचे गंभीर परिणाम पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांनी भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा देवानंद परब यांनी दिलेला आहे.
पिसुर्ले भागाच्या सभोवताली परिसरामध्ये खनिज खाणी आहेत. खनिज व्यवसायामुळे या भागातील पाण्याची पातळी बरीच खाली गेलेली आहे .यामुळे नैसर्गिक पाणीपुरवठा या ठिकाणी उपलब्ध होत नाही. नळाद्वारे होणाऱया पाणीपुरवठय़ावर या भागातील ग्रामस्था?ना पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. सध्यातरी नळ कोरडे पडल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याने या संदर्भात देवानंद परब यांन नाराजी व्यक्त केली.









